
IAAPI Amusement Expo ला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची भेट, आधुनिक मनोरंजन तंत्रज्ञानाचा घेतला अनुभव
मुंबई(Mumbai), गोरेगाव दि. १२ मार्च २०२६
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 24th IAAPI Amusement Expo या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनाला महाराष्ट्राचे वित्त, कामगार, विधी व न्याय, नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी भेट देत विविध आधुनिक मनोरंजन व क्रीडा उपकरणांची पाहणी करिता भेट दिली.
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील अनेक कंपन्यांनी अम्यूसमेंट पार्क, व्हर्च्युअल रीयॅलिटि (VR) गेम्स,ॲडवेंचर राईड्स, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर, तसेच मुलांसाठी व कुटुंबासाठी मनोरंजन सुविधा यांचे अत्याधुनिक प्रकल्प सादर केले होते.
यावेळी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी काही मनोरंजन उपकरणे व ॲक्टिव्हिटींची स्वतः प्रत्यक्ष चाचणी करून अनुभव घेतला. विशेषतः व्हर्च्युअल रियॅलिटी राईड, ॲडव्हेंचर सिम्युलेटर आणि मनोरंजन वाहन यांचा त्यांनी आनंद लुटला.

या भेटीदरम्यान त्यांनी प्रदर्शनातील विविध उद्योजकांशी संवाद साधत पर्यटन, मनोरंजन उद्योग आणि युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.
राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की,
“भारतामध्ये पर्यटन व मनोरंजन उद्योग वेगाने विकसित होत आहे. अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळत नाही तर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होते. महाराष्ट्रातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.”
या प्रदर्शनादरम्यान विविध कंपन्यांनी सादर केलेल्या नव्या कल्पना, आधुनिक राईड्स आणि मनोरंजन सुविधांमुळे भविष्यातील पर्यटन व मनोरंजन क्षेत्रातील संधींचा आढावा घेण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.















