
ऊर्जा क्षेत्रातील महाजेनको, महाट्रान्सको, पॉवरग्रिड आणि यजमान धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचा या स्पर्धेत समावेश
चंद्रपूर(Chandrapur): ऊर्जा क्षेत्रात कार्य करणाऱ्या उद्योग व संस्थांमध्ये परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ व्हावी या संकल्पनेतून धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या वतीने “पॉवर कप क्रिकेट स्पर्धा – २०२६” आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेमध्ये ऊर्जा क्षेत्रातील विविध नामांकित उद्योगांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यात विशेषतः महाजेनको, महाट्रान्सको, पॉवरग्रिड आणि यजमान धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचा समावेश होता. उद्योगात कार्य करणाऱ्या अनेक कर्मचारी व कामगारांना वैविध्यपूर्ण कौशल्य व सुप्त गुणांचे वरदान असतात परंतु रोजगाराच्या तणावात त्यांना गुण कौशल्यांना सिद्ध करण्याचा व्यासपीठ हा कुठेतरी उपलब्ध होत नसतो. खेळाडूंमधील क्रीडा गुणांचे उत्तुंग प्रदर्शन बघायला मिळावे करिता हा उपक्रम व आयोजन हे या उद्दिष्टाची पूर्ती करण्याचा यशस्वी प्रयत्न आहे असे प्रतिपादन यावेळी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड प्लांट हेड देवेश कुमार यांनी केले.
प्रसंगी धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे महाव्यवस्थापक सर्वश्री पुंडलिक वनवे, अतुल गोयल, कौशिक भट्टाचार्य, उपमहाव्यवस्थापक दिनेश गाखर, मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिष नायर व धारिवाल इन्फ्रास्ट्रकर लिमिटेड चे अन्य कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर पॉवर कप क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट क्रीडा कौशल्याच्या अनेक लढती यावेळी झाल्या. अंतिम सामना महाजेनको आणि धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यात झाला दि. २८ मार्च रोजी संपन्न झाला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले महाजेनको हा संघ उपविजेता ठरला. या विशेष क्रिकेट स्पर्धेच्या आयोजबद्दल सर्व संघांचे, सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करीत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार यावेळी महाव्यवस्थापक पुंडलिक वनवे यांनी व्यक्त केले.















