अधिवेशन ७ डिसेंबरपासूनच सुरु होणार

0

(Mumbai)मुंबई– विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरु होणार आहे. अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. (Nagpur Assembly Winter Session 2023)
विधानभवनात आयोजित बैठकीस (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, (Legislative Council Deputy Chairman Dr. Neelam Gorhe)विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, (Legislative Assembly Vice President Narahari Jirwal)विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Deputy Chief Minister Ajit Pawar)उपमुख्यमंत्री अजित पवार, (Parliamentary Affairs Minister Chandrakant Patil)संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, (Assembly Opposition Leader Vijay Wadettiwar)विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनांच्या तारखांबाबत अनिश्चितता होती. मात्र, ते पूर्वनियोजित तारखेनुसार ७ डिसेंबर रोजीच सुरु होणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. सध्यातरी अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, अधिवेशनाच्या दरम्यान होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात आले.