शेत जमीन देऊनही नोकरी नाही !

0

 

12 वर्षात पायपीट

(Amravti)अमरावती – अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याला शेतकऱ्यांनी 12 वर्षापूर्वी शेतीचा दर 40 ते 50 लाख रु प्रती एकर असताना केवळ कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी अमरावती व रेल्वे विभागाने दिल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावात दिल्या.

मात्र, कारखाना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी परप्रांतीय नागरिकांची नेमणूक केली. जमिनी देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना डावलले, आता हे शेतकरी आक्रमक झाले असून, जोपर्यंत नोकरी देणार नाही तोपर्यंत या कारखान्याचे उद्घाटन होऊ देणारं नाही अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.