Home Artical Blog त्रिमूर्तीनगर आणि एमआयडीसी भागात आज काही काळ वीज नाही

त्रिमूर्तीनगर आणि एमआयडीसी भागात आज काही काळ वीज नाही

0

नागपूर(Nagpur), दि. 24 मार्च 2026: महावितरणच्या नागपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या काँग्रेस नगर आणि बुटीबोरी विभागातील काही वीज वाहिन्यांच्या तातडीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामांमुळे बुधवार, 25 मार्च 2026 रोजी त्रिमूर्तीनगर उपविभाग आणि बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा सकाळी काही तासांसाठी बंद राहणार आहे.

त्रिमूर्तीनगर उपविभागातील विविध वस्त्यांमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते 11 या वेळेत संघर्ष नगर, जयताळा, झाडे लेआउट, प्रधान नगर, शिवप्रिया अपार्टमेंट, रमाबाई आंबेडकर नगर, अमलतास अपार्टमेंट, शारदा नगर, साई लेआउट आणि कबीर नगर या भागातील वीजपुरवठा बंद राहील. तर सकाळी 8:30 ते 11:30 या दरम्यान स्वरूप नगर, गावंडे लेआउट, रवींद्र नगर, टेलिकॉम नगर, सरस्वती नगर आणि दीनदयाल नगर परिसरातील वीजपुरवठा खंडित असेल. याव्यतिरिक्त, सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत पठाण लेआउट, बंडू सोनी लेआउट, लोखंडे नगर, गजानन नगर, पारेख लेआउट, सरस्वती विहार कॉलनी, डंभारे लेआउट, त्रिमूर्ती नगर, कॉसमॉस टाऊन, गोरले लेआउट आणि द्रोणाचार्य नगर या भागांतील वीज सेवा तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे.

बुटीबोरी विभागातील एमआयडीसी उपकेंद्रावरील वाहिनी क्रमांक 12 वरील ‘ए’ झोनचा काही भाग, तसेच वाहिनी क्रमांक 7 आणि वाहिनी क्रमांक 3 वरील ‘ब’ आणि ‘ए’ झोनमधील उद्योगांचा वीजपुरवठा देखील देखभाल कामामुळे सकाळी 10 वाजता पासून प्रभावित होणार आहे.

वीजपुरवठा खंडित राहणाऱ्या कालावधीत ग्राहकांनी आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन करावे आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. काम पूर्ण होताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर.

In some areas of Nashik, power supply will be cut off for three consecutive  days, from July 8 to 10, from 10 am to 2 pm, and on the 12th, i.e. Saturday,