हा काळा दिवस- प्रकाश अण्णा शेंडगे

0

 

जळगाव-या राज्याच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील, ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या आयुष्यातील हा काळा दिवस आहे अशी टीका ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केली आहे. आज मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन उघडपणे हे षडयंत्र केलं गेलं. हे उघडपणे आज सांगितले देखील आहे
54 लाख कुणबी दाखले सापडले आहेत हे राज्य सरकारने सांगितले आहे.राज्य सरकार मराठा समाजाच्या दडपणाखाली आले आहे.
फक्त दाखले रक्त दाते संबंधातील आधी कायदा होता आता त्यात बदल केला आहे. OBC, SC, ST या सर्व समाजाला लागू होईल, असा कायदा केला आहे. याचा आम्ही निषेध करू
फक्त शपथपत्रावर दाखले प्राप्त होत असतील तर चुकीचे आहे. या राज्यातील तीन कोटी ओबीसी बांधव या मसुद्याला हरकती नोंदवतील.आम्हाला माहित आहे आता सरकार आमचे ऐकणार नाही
ही घटना आजचा काळा दिवस आहे. ओबीसी, भटके विमुक्त आणि दलित संघटना याला विरोध करेल. मराठा समाजाला खूश करण्यासाठी हे काम केलेले आहे.EWS हक्काचे आरक्षण हक्काचे आहे त्यामुळे जो कुणबी दाखला घेईल तो यापासून वंचित होईल.मराठा समाजाचा आज फायदा झाला आहे का? नुकसान झाले आहे याचा विचार केला पाहिजे. ओबीसी आता बघत बसणार नाहीत. सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. शिंदे, फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आता आपली भूमिका जाहीर करावी. आमच्या पाठीत खंजीर खुपायला आहे. आता या सरकारला खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही.आम्ही सोमवार किंवा मंगळवार या दिवशी राज्यपाल यांना भेटणार आहोत. आणि त्यानंतर या आदेशाची होळी करणार आहोत. ज्या सत्तेच्या माध्यमातून हे सगळं लुटलं आहे. त्यामुळे केसाने आमचा गळा कापला आहे.आम्ही आता राजकीय नवीन पर्याय उभा करू,आरक्षण वाचवण्यासाठी आम्हाला राजकीय लढाई सुरू करावी लागेल. 2024 निवडणुकीत आम्ही धडा शिकवू .आमच्या मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली आहे
आम्ही मुंबईत मोर्चा काढू आणि उत्तर देऊ,गणगोत हा शब्द खूप मोठा आहे. नुसत्या शपथपत्रावर जात बदलून चालत नाही, आम्ही यापुढे राजकीय लढाई करू,मराठा समाज गरीब आहे. मग हेलिकॉप्टर, एवढे वाहन, जेसीबी कुठून आले त्यांच्याकडे, याचे उत्तर द्याव, ही, लढाई तेवढी सोपी राहिलेली नाही. आम्ही सुद्धा ओबीसी पर्याय देऊ पाहत आहोत .भुजबळ साहेब एकटे ही भूमिका घेत आहेत.त्यांच्या पक्षातील लोक त्यांना पाठिंबा देत नाहीत. मात्र, त्यांनी मुळीच राजीनामा देऊ नये सरकारमध्ये राहून लढा द्यावा
आज आम्ही वकीलांशी चर्चा केली आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत आम्ही हरकती मागू आणि कोर्टात लढा लढू
या मसुद्याविरुद्ध आव्हान देणार. हे मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही असेही प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले.