कारसेवेच्या परिस्थितीची आठवण म्हणून ते ट्विट – देवेंद्र फडणवीस

0

 

नागपूर NAGPUR  -ज्यांनी रामाचे अस्तित्व अमान्य केले अशा लोकांना, मूर्खांना मी उत्तर देत नाही. मला वृत्तपत्रातून त्यावेळेचा एका फोटोग्राफरने काढलेला हा फोटो पाठवला त्यांचे आभार मानत मी ट्विट केलं आहे. त्यावेळची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची आठवण पुन्हा मला झाली. त्या आनंदात मी ट्विट केले Devendra Fadnavis.

कुणाला उत्तर देण्याच्या भानगडीतही मी पडत नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. हे तेच लोक आहेत. ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व नाकारलेलं आहे . त्यांना मी उत्तर देत नाही. संपूर्ण देश हा राममय आहे, मी राम भक्त आहे. मी कारसेवक आहे मी सुद्धा राममय आहे.मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे अयोध्येला जाणार आहे असे स्पष्ट करीत मनोज जरांगेच्या प्रश्नावर योग्यवेळी उत्तर देईल असे फडणवीस म्हणाले.