Amit Shah केंद्रीय मंत्री अमित शहा आज नागपुरात

0

नागपूर (NAGPUR) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर हा त्यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा असून (HM Amit Shah Nagpur Visit) ते गुरुवारी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर (eknath shinde devendra fadnavis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सायंकाळीच नागपुरात दाखल होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी रात्री दहा वाजता दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी काल मंगळवारी पोलिस आयुक्तांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली. वर्धा रोडवरील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये अमित शहा थांबणार असून रात्रीपासूनच या हॉटेलबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. बीडीडीएसकडून एनसीआय परिसरात तपासणी केली जात आहे. अमित शाहांसाठी स्पेशल बुलेटप्रूफ वाहनही नागपूरला आले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल केला जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील कार्यक्रमामुळे 26 व 27 एप्रिलला वाहतुकीत अंशत: बदल करण्यात येत आहे. आवागमनाचे संपूर्ण मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून नागपूर वाहतूक पोलीसांकडून वाहतुकीचे दृष्टीने विविध ठिकाणी वाहतूक वळती करण्यात येणार आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रोडवर यादरम्यान गर्दी राहील, तरी या मार्गावर रात्री व सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.