
अवकाळी पावसाची हजेरी,मोठे नुकसान,लग्न समारंभात तारांबळ
नागपूर (Nagpur) -विदर्भातील अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. शनिवार,रविवारी दोन दिवस नागपुरात जोरदार पावसाने हजेरी लावली. झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला तर मोठ्या प्रमाणात शेतमालाची नासाडी झाली. अनेक लग्न,स्वागत समारंभात तारांबळ उडाली. 17 आणि 19 मार्च रोजी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे . दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, उमरखेड, दारव्हा, पुसद तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळाली.चार तालुक्यांमध्ये गारपीटसह अवकाळी पावसाने पपई पिकासह गहू पिकाचे मोठे नुकसान झाले.
विजेच्या कडकडाटासह चार तालुक्यांमध्ये गारपीट झाली.अवकाळी गारपीट पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आर्णी तालुक्यामध्ये अनेक घराची पडझड झाली.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog



















