खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर यांच्या वतीने विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन

0
खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर यांच्या वतीने विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांवर आधारित विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन

नागपूर (Nagpur) : खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर यांच्या वतीने १६ व १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्या ७ या वेळेत श्री संताजी सभागृह, सक्करदरा येथे विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांवर आधारित असून भजन मंडळांनी १२ मिनिटांत २ भजने सादर करायची आहेत. १२ जणांपर्यंत सहभाग अनुमत असून खंजरीसह टाळ, तबला, हार्मोनिअम अनिवार्य आहेत.

महाअंतिम फेरी १८ जुलै रोजी होईल आणि सायंकाळी ६ वाजता ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल.

पुरस्कार:

प्रथम: ₹1,00,000
द्वितीय: ₹71,000
तृतीय: ₹51,000

चौथा ते सातवा: ₹41,000 ते ₹11,000

10 उत्तेजनार्थ मंडळांना प्रत्येकी ₹5,000

अर्जाची मुदत: १९ जून ते २ जुलै २०२५ (फक्त ऑफलाइन)
अर्जासाठी संपर्क: 9766573802 / 0712-2727127 इत्यादी.

Bhajan competition winners
Bhajan competition 2020