
ही तर डकैती…
विदर्भ साहित्य संघाची निवडणूक आता कुख्यात झालीय्… ही निवडणूक पूर्णत: बोगस आहे, निवडणुकीत भ्रष्टाचार होतोय, लोकशाहीतली सर्वच्या सर्व मूल्य पायदळी तुडवत सारस्वत साम-दाम-दंड-भेद आणि व्देषाच्या एकसमयावेच्छेद वृत्तीतून ही निवडणूक खेळत नाहीत, तर लढताहेत, हे मी पत्रकार या नात्यानं अतिशय जबाबदारीनं लिहिलं होतं.
माझ्या याच भिंतीवर दि. २२, २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी लिहिलेले लेख अजुनही आहेत… आज, १४ दिवसानंतर मी पुन्हा या भिंतीवर आलोय…विदर्भ साहित्य संघाचं नामकरण या निवडणुकीच्या निमित्तानं ‘विदर्भ तमाशा संघ’ करावं काय, असा प्रश्न विदर्भातील सारस्वतांना आता पडलाय्… वैदर्भीय सारस्वत आता हे असं बोलू लागले आहेत…
‘मतचोरी’ आजवर मी ऐकली होती, या निवडणुकीत मत-डकैती होत आहे, हे पटतंय् काय….???? संघाच्या निवडणूक अधिका-यांनी संघाच्या आजीव सदस्यांकडे मतदान पत्रिका रजिस्टर्ड AD नं पाठविल्यानंतर त्या मतदाराच्या घरी पोहोचण्यापूर्वी परस्पर लांबवल्या गेल्या… ही पद्धत चोरीची नाही, ही पद्धत डकैतीची आहे… या पद्धतीनं मतपत्रिका लांबवणारे चोर नाहीत, तर डाकू आहेत…सारस्वत आता डाकुंच्या नव अवतारात क्लोन झाले, असं म्हणायचं का..????
या डकैतीची सविस्तर माहिती तपशीलासह, डाकूंच्या नावासह आणि ज्यांच्या मतपत्रिकांवर डकैती केली गेली, त्यांच्या नावासह – तक्रारींसह निवडणूक अधिका-यांकडे पोहोचली… जी काय करायची ती शहानिशा करायची ती करून निवडणूक अधिका-यांनीही या डकैतीचा दुजोरा दिला… पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं… हा जो प्रकार आहे, तो लज्जास्पद आहे, डाकूंच्या सरदारांकरिता अशोभनिय आहे… परिटघडीचं नेसू नेसायचं, मुखवटातून दात विचकटायचे, गोड बोलायचं आणि आपल्याच खुशमस्क-यांकडून हा असा डकैतीचा अश्लाघ्य प्रकार घडवायचा, असा प्रकार जर स्वतःला सारस्वत म्हणवणारे करत असतील, तर यांना काय म्हणायचं…???? चोर, डकैतच म्हणावं लागेल ना…???
सारस्वतांचे कंपू आजवर आपण बघितले, आज टोळ्या अनुभवत आहोत…. कशाकरिता हे सगळं..??? म्हातारचळ म्हणायचे की बुद्धी भ्रष्ट झाली, असं समजायचं…???? मला दुख: याचं, की समाजाचं सतत प्रबोधन करणारे, समाजाला उठसुठ शहाणपण शिकवणा-या या सारस्वतांनी सिद्ध केलं, की आम्हीही त्याच श्रेणीतले, हमाम में सब भोंगळावाले, मी नाही त्यातली कडी लावा आतलीवाले, लोका सांगे तत्वग्यान स्वत: कोरडे पाषाणवाले…. बोला, मान्य आहे ना…ॽॽ
यापेक्षा दारुण दु:ख ते हे की, एवढं सगळं घडतय्, मुखंडांच्या टोळीतले डाकू मतपत्रिकांची डकैती करताहेत, डाकू पकडल्या गेल्यावर आपल्या आपल्या आकाच्या टोळीचं नाव सांगताहेत, नागपुरातल्या दैनिकांमधून सारं छापून येत आहे, निवडणूक अधिकारी शहानिशा करुन, हो, हे असं घडलं, असा दुजोरा देताहेत, आणि तरीही सगळ्या सारस्वतांनी मिठाची गुळणी धरलीय्… ना कुणी निषेध केला, ना कुणी खंडन केलं…अरे, एकतर या डकैतीचं समर्थन करा, किंवा विरोध तरी करा… बसले सगळे हलवत…ना उजवे बोलताहेत, ना डावे लिहिताहेत.. सगळे शिखंडीच्या औलादी…
सारस्वत शिखंडी का झाले, तर सब ** मौसेरे भाई आहेत… उंदरांना मांजराची साक्ष… दाल में कुछ काला नहीं, सब – पुरी का पुरी दाल काली हैं… संघात जे चाललय् ना, तो नीचपणा आहे… लोकशाही आणि संविधान व्यवस्थेची थट्टा आहे… ही थट्टा करताना, टपाली मतदान हे असंच असतं, असा जो राग जे स्वनामधन्य आळवताहेत, चोरी-डकैती करताहेत, या मंडळींचा DNA तपासायची गरज आहे…
या सगळ्या चो-या मा-या डकैती एक्सपोझ करण्यात मुद्रीत माध्यमांमधील सांस्कृतिक प्रतिनिधींनी मात्र कमाल केली… याकरिता मी सगळ्यांचं, त्यातही दैनिक लोकमतचे सांस्कृतिक प्रतिनिधी श्री. निशांत वानखेडे यांचं अभिनंदन करीन… हे अभिनंदन याकरिता, की श्री वानखेडे यांनी सत्य शोधलं, तथ्य पाठपुरावा करुन मांडलं…नागपुरातून प्रकाशित होणा-या सर्वच मुद्रीत माध्यमांनी संघातील या *श्लिल व्यवहाराची दखल घेतली, सगळ्यांचं कौतुक… दृक्श्राव्य माध्यमांना यात टीआरपी दिसलाच नाही, हेही नोंदवलं पाहिजे…त्याच वेळी मिठाची गुळणी धरून, ‘मी नाही त्यातली’ भूमिका करणा-या सारस्वतांच्या षंढपणाचंही कौतुक…
हा संघ, साहित्य सारस्वतांचा नाही, तर संगीत बारीत ढोलकीच्या तालावर – पैंजणांच्या नादावर निलाजरेपणानं नितंब हलवणा-यांचा आहे, हे सिद्ध झालं, हे बरं झालं… नाही तरी या पोस्टल बैलेट तमाशानं लाज आणली, सारस्वतांची मती आणि नीती भ्रष्ट केली, अशी माझी भावना आहे.
विदर्भ साहित्य संघाचे साडे सात हजाराच्या आसपास मतदार आहेत… या बिचा-यांना विचार नाही आणि विवेकही नाही.. गांधींची ही माकडं आहेत. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे. कानात बोळे आहेत. या मंडळींना वाचाही नाही.. हा तमाशा बघायचा, की साहित्य सरस्वतीच्या अर्चनेकरिताची भूमिका घ्यायची, हा प्रश्न ज्याचा त्याचा…
तुर्तास एवढेच…
श्री रवी गुळकरी यांच्या फेसबुक वाॅलवरून साभार…..















