Assembly elections in Maharashtra : व्होट जिहाद : ‘या’ बँकेची चौकशी होण्याची शक्यता

0

Assembly elections in Maharashtra : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. राज्यात सर्वत्र महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या सभा सुरु आहेत. राज्याचा राजकीय पार वाढला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खरतर महाराष्ट्रात प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. येत्या 18 तारखेला संध्याकाळी प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

ईडीकडून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण 23 ठिकाणी छापे मारण्यात आले. व्होट जिहाद प्रकरणाशी या छापेमारीचा संबंध असू शकतो. नॅशनल मर्कटाइल बँकेशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी आहे. 100 कोटीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाच हे प्रकरण आहे. नाशिकमधून अटक केलेल्या सिराज अहमदशी संबंधित ही छापेमारी आहे. व्होट जिहादसाठी 100 कोटीहून अधिक पैशांचा वापर झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

दोन दिवसांत धमाका होणार असल्याच वक्तव्य

125 कोटींच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी ईडीची टीम मालेगावात दाखल झाली आहे. प्रमुख आरोपी असलेल्या सिराज अहमदच्या घरी ईडीकडून तपासणी सुरू आहे. नामको बँकेची देखील ईडीचौकशी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात चर्चा करणार. व्होट जिहादसाठी हा पैसा वापरला गेल्याचे किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केलं होतं. काल किरीट सोमय्या यांनी येत्या दोन दिवसांत धमाका होणार असे वक्तव्य केले होते.

Previous articleपंडित नेहरूंच्‍या जयंती निमित्त रक्तदान शिबिर
Next articleचर्मकार समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील
Priyanka Thakare
प्रियंका ठाकरे, ही शंखनाद न्यूज चॅनेलमध्ये न्यूज अँकर आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत आहे. २०२३ पासून ती पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून मासकम्युनिकेशनमध्ये एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे. फिल्ड रिपोर्टींग, विविध विषयावर तज्ज्ञाच्या मुलाखती घेतल्या आहेत. Shanknaad is a multilingual news channel available in Hindi, Marathi, and English. It covers news from across the country, including Maharashtra, Gujarat, Madhya Pradesh, Chhattisgarh, Delhi, and Mumbai. The channel focuses on a variety of topics such as politics, social causes, sports, employment, religion, lifestyle, business, and food. With the growing consumption of digital media and the majority of the global population active on social media platforms like Facebook, Twitter, Instagram, and YouTube, Shanknaad is also accessible to its users on these platforms.