मतदान हे आपलं कर्तव्य, अधिकार

0

 मोहन भागवत

नागपूर(Nagpur): महाराष्ट्रात आज पहिल्या टप्प्यातील पाच ठिकाणी मतदान होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला.यावेळी मतदान हे आपलं कर्तव्य आणि अधिकार आहे यावर त्यांनी भर दिला. मतदानाद्वारे आपण आपल्या देशाचे पुढील पाच वर्षांचे भवितव्य ठरवतो म्हणून प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे असे आवाहन

मोहन भागवत यांनी केले. भैयाजी जोशी, सरकार्यवाह, सुनील जोशी, यांनीही मतदानाचे आवाहन केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून रामटेक मतदारसंघ मधील कोराडी केंद्रावर मतदान झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला बळ देण्यासाठी आज मतदान केले आहे.मला विश्वास आहे की, पहिल्या टप्प्यातील विदर्भातील सर्व सीट्स 51% च्या वर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील. मोदींना मतदान करण्यासाठी जनतेमध्ये उत्साह आहे. जनतेने सर्वाधिक मतदान करावं असे नागरिकांना आवाहन आहे. नितीन गडकरी यांनी सहकुटुंब महाल टाऊन हॉल येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वांनी मतदान करावे,मोदींच्या नेतृत्वात ४०० पार होणारचं असा मला विश्वास आहे की, निश्चितपणे यावेळी मतदान चांगलं होईल. जनता विकासकामांना कौल देईल, या निवडणुकीत मी भरघोस मतांनी विजयी होईल असा मला विश्वास आहे
असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.