– लोकसहभागातून जलसमृध्दीसाठी जलजागृती सप्ताह

0

 

– १६ ते २२ मार्च या कालावधीत विविध उपक्रमाचे आयोजन

लोकसहभागातून जलसमृध्दी हि संकल्पना घेवून दरवर्षी १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जलजागृती सप्ताहाचे हे 9 वे वर्ष असून या वर्षी १६ ते २२ मार्च 2024 या कालावधीत जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, शिक्षण विभाग, माहीती विभाग व भारतीय जलसंसाधन संस्था (IWRS) नागपूर केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ आजपासून झाला.

 

रविवार दि. १७ मार्च – Water Rally निघणार आहे. सकाळी – ९.३० वाजता अंबाझरी तलाव येथून रॅलीचे उद्घाटन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के करतील.

विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. प्रकाश पवार, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण महाजन उपस्थित राहतील.

हि रॅली मार्ग – अंबाझरी तलावापासून सुरवात. जयताळा चौक, प्रतापनगर चौक, माटे चौक, लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, लोकमत चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, व्हेरायटी चौक, महाराज बाग चौक, आरटीओ चौक, लॅा कॅालेज चौक, रवीनगर चौक या प्रमुख मार्गाने जाणार असून फुटाळा तलाव परिसरात या रॅलीचा समारोप होईल.

या सर्व कार्यक्रमासाठी जनतेनी उपस्थित रहावे असे अव्हान राजेश सोनटक्के, समिती अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक, विपाविम, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण महाजन, डॅा. प्रकाश पवार, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर. मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, सौ. सानाली चोपडे, नागपूर जिल्हा संयोजक तथा अधिक्षक अभियंता लाक्षेविप्रा. ,बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम यांनी केले आहे.