(Nashik)नाशिक : अकोले तालुक्यातील (Nilwande Dam)निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातुन आज पाणी सोडन्यात येणार आहे. या मुळे संगमनेर, अकोले, राहात, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपुर आणि नाशिक जिल्हातील सिन्नर तालुक्यातील182 दुष्काळी गावांना याचा फायदा होऊन ही गावे लागवडीखाली येणार आहेत. यामुळे निळवंडेच्या पाण्यावरून चालेल्या राजकारणाला पुर्ण विराम मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही चाचणी होणार आहे.