बोरी अडगाव येथे सशस्त्र दरोडा एकाच कुटुंबातील चार जण जखमी

0

 

(Khamgaon)खामगाव : बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव (B0ri Adgaon )येथून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी 5 ते 6 जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली.दरोडेखोरानी लाठ्या, लोखंडी पाईप आणि चाकूने वार केल्याने एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले.जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. ,यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला रेफर केले. तायडे कुटुंब बाळापूर रोडवर गावापासून दोन किलोमिटर अंतरावर शेतामध्ये राहतात. रात्री दहा वाजताच्या सुमारास अचानकपणे 5 ते 6 जणांनी हातामध्ये काठ्या, चाकू व इतर साहित्य घेऊन घरामध्ये प्रवेश करत मारहाण सुरू केली. यावेळी गौरव आणि त्याच्या भावाने विरोध केला असता, चोरट्याने दोघांसह घरातील महिलांनाही मारहाण करत रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची पोत तोडून जवळपास अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनस्थळी पोहोचले.या घटनेमुळे परिसरामध्ये एकच दहशत पसरली आहे.