
नाशिक NASHIK : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अद्याप जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली नसली तरी भाजपच्या मित्रपक्षांनी आपल्या मागण्या रेटायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाइतकेच आमचेही आमदार आले असल्याने आम्हालाही तेवढ्याच जागा मिळायला हव्या, असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
आम्हालाही न्याय मिळायला हवा, असे भुजबळ म्हणाले. आमदारांची संख्या जवळपास सारखी असली तरी अजित पवार गटाकडे खासदारांची संख्या ४ तर शिंदे गटाकडे १३ खासदार आहेत, हे विशेष. त्यामुळे अजित पवार गट नेमक्या कोणत्या आधारावर शिंदे गटाच्या बरोबरीने जागांची मागणी करीत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















