आमदारांना अपात्र करण्याच्या याचिकेवर कायद्यानुसार निर्णय घेऊ-नार्वेकर

0

 

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या एकूण ९ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Petition by NCP State President Jayant Patil) विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे. या याचिकेचा योग्य तो अभ्यास करून कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना (Speaker of Legislative Assembly Rahul Narvekar) दिली. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाची नियुक्ती देखील अध्यक्षांचा अधिकार असून कायदेशीर तरतुदीनुसार विरोधी पक्ष नेते पदाची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला व ते सरकारमध्ये सामील झाले आहेत. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे यांच्यासह इतर अशा ९ नेत्यांचा समावेश आहे. या सर्व आमदारांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. ई-मेल आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचा संपूर्ण अभ्यास करून कायदेशीररित्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

याचिकेत काय नमूद केलेय?

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या आणि पक्षाच्या हिताच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ सदस्यांनी राजभवन येथे जाऊन शपथ घेतली. त्यांची ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे त्यात नमूद करण्यात आलेय.