काय आहेत निकालाच्या शक्यता?

0

मुंबई MUMBAI -शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरणार काय? या प्रश्नाचे उत्तर अवघ्या काही तासांत मिळणार असतानाच राजकीय वर्तुळात आणि तज्ज्ञांमध्ये निकालाबद्दल वेगवेगळ्या शक्यतांवर चर्चा सुरु आहेत. तज्ज्ञांच्या मते आमदार अपात्र ठरतील किंवा त्यांना पात्र ठरवून ठाकरे गटाची याचिका फेटाळली जाईल, अशा दोनच शक्यता निकालात आहेत.

एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता आमदार अपात्र ठरण्याची शक्यता तुर्तास दिसत नसल्याचे अनेक तज्ज्ञांना वाटते. (MLA Disqualification Case)निकालाच्या शक्यतांवर बोलताना बोलताना अॅडव्होकेट असीम सरोदे म्हणाले की, आमच्या दृष्टीने ‘बेकायदेशीर’ निकाल म्हणजेच आमदार पात्र ठरण्याची शक्यता अधिक आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांना अपात्र ठरविले जाण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, विरोधकांनाही निकाल विरोधात जाण्याची शक्यता वाटत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाव्य निकालाबाबत भाष्य करताना निकाल विरोधात जाण्याची शक्यताच अधिक असल्याचे मत व्यक्त केले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारही आहेत व त्यांना पक्षाची बाजू सांभाळणे भाग असल्याची टिप्पणीही चव्हाण यांनी यासंदर्भात केली आहे. निकाल विरोधात गेल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल व त्यावेळी भूकंप येईल, असे भाकितही चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.