भाजपला छोटे पक्ष संपवायचेत- यशोमती ठाकूर यांनी का केला आरोप

0

 

अमरावती – भाजपला छोटे पक्ष संपवायचे आहेत असेच धोरण सुरू आहे.त्यांना वन नेशन, वन पार्टी ठेवायची आहे. ते लहान पार्टीला महत्त्व देत नसून षडयंत्र करून लहान पार्टीला तोडफोड करून त्यांना संपवायचे असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी महायुतीच्या बैठका सुरू असतानाचं काँग्रेसनेही राज्यामध्ये विभागीय बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यातील पहिली बैठक ही उद्या अमरावतीला होणार असून यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय रमेश चेन्निथला, नाना पटोले, अशोकराव थोरात, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील नेते व अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची विचारधारा एकच आहे. त्यामुळे मोठ्या मनाने या सर्व गोष्टी मान्य झाल्या पाहिजेत. आपण सर्व धर्म समभावाचे संविधानाचे पाईक आहोत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यायला पाहिजे आणि सोबत रहायला पाहिजे. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये आले पाहिजेत. यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सुद्धा सहभागी झाले पाहिजे असे सांगितले.