बुलढाणा – महाराष्ट्राच्या भूमिला, महाराष्ट्राच्या संस्काराला संपूर्ण देशामध्ये सुसंस्कृत मानले जाते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
मात्र या महाराष्ट्रातील काही प्रमुख नेते जर अशा अर्वाच शब्दात काही आरोप करत असतील तर त्यांच्याबद्दल मी जास्त काय बोलणार असेही सांगितले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातात तो महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी.
आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी दिल्लीला जातात ते सोनिया गांधीच्या पायाशी लोटांगण घालून तुमच्या युतीमध्ये आम्हाला जागा ठेवा यासाठी असा आरोप खा प्रतापराव चिखलीकर यांनी केला.
एकनाथ शिंदे वारंवार जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. तुम्ही पाहिले असेल चिखलीला 13 तारखेला आले.
शंभर दोनशे लोकांनी त्यांचे स्टेजवर सर्व सेक्युरिटी बाजूला सारून स्वागत केलं त्यांच्यासोबत सेल्फी काढली.
कुणी त्यांच्यासोबत हस्तांदोलन केलं.
दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या अनेक सभा बुलढाणामध्ये झाल्या 25 फुटाच्या रिंगणाच्या आत शिवसेनेचा लोकप्रतिनिधी आणि जिल्हाप्रमुख सारखा एक प्रमुख पदाधिकारी त्यांच्याजवळ फिरकू शकत नव्हता.
संजय राऊत आणि आपली स्वतःची सिक्युरिटी वाढवण्यासाठी खोटे कॉल पोलीस स्टेशनला केले की मला अतिरेक्यांनी धमकी दिली, माझी सिक्युरिटी वाढवा. आता काल-परवा मातोश्रीला सुद्धा धमकी आली. मातोश्रीची सेक्युरिटी वाढवा असे हे नाटक सेक्युरिटी वाढवण्यासाठी त्यांना करावे लागत आहे असे टीकास्त्र सोडले. उगीच आक्षेप घेण्यात अर्थ नाही.अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः कायदे तज्ञ,वकील आहेत. या अगोदरही निवडणूक आयोगाने हाच निकाल दिला होता आणि राहुल नार्वेकर साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. अतिशय खालच्या दर्जाचे आरोप ते महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचे नेते असणाऱ्या माणसांवर करत आहेत..खरं म्हणजे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे. काही दिवसातच संजय राऊत कपडे फाडून गल्लीबोळात फिरताना आणि लोकांना दगड मारताना दिसेल. हा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडला असता यावर भर दिला.
महाराष्ट्र मध्ये विकासाचा जो रथ अतिशय जोराने चालू आहे..ते लोक बघतात..आता त्यांच्याकडे बोलायला दुसरे काही नाही म्हणुन बेछूट आरोप या लोकांनी सुरू केले.माध्यमात राहण्यासाठी हे आमच्यावर आरोप करत आहेत.