बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचे 4 डिसेंबर पासून कामबंद आंदोलन सुरू आहे. आजही बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी केली आहे. अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात यावी, ग्रॅच्युअटी द्यावी, ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध व्हावा, यासह विविध मागण्यासाठी जयस्तंभ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नंदकिशोर गायकवाड, जिल्हाध्यक्ष आयटक, कॉम्रेड सुरेखा तळेकर, जिल्हा सचिव आयटक बुलढाणा यांनी नेतृत्व केले.