पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?

0

 

शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्‍हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्‍हणजे सोमाच्‍या दिशेकडे मंदिराच्‍या विस्‍ताराच्‍या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्‍हणजे नाला जातो, त्‍याला सोमसूत्र म्‍हणतात. शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतांना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास, तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे रहावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण करावी.

शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.