
यवतमाळ (Yawatmal) – आर्णीच्या सदोबा सावळी येथे दोन दिवसापूर्वी सराफा व्यापाऱ्याला भर रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवत पाच अज्ञातांनी लुटले. आज यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने या पाच आरोपींना मुद्देमालासह अटक केली. शेख अफसर शेख शारिक, फैय्याज खान बिसमिल्ला खान, शेख निसार शेख उस्मान, शेख जमीर फैमोद्दिन, शाकीब खान अय्युब खान, राहणार सर्व उमरखेड यांचा यात समावेश आहे.
आरोपींकडून 25 लाख 92 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून अवघ्या दोन दिवसात या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले अशी माहिती पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog


















