
महाराष्ट्र आणि देशात वने,वाघ आणि वन्यजीवा साठी प्रसिद्ध असलेल्या आणि विशेषतः वाघ – मानव संघर्षासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन क्षेत्रात सनफ्लॅग ह्या लोह खानिसाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. देशातील, महाराष्ट्रातील, विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वने, वन्यजीव प्रेमींचा ह्या लोह खाणीला विरोध आहे. तसेच नागरिकांनी, राजनेते आणि संस्थानी सुद्धा विरोध करावा अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटी चे अध्यक्ष आणि केंद्रीय वन,पर्यावरण मंत्रालयाचे माजी सदस्य प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.

लोह खानी ची सविस्तर माहिती:
लोहार डोंगरी खान ही बफर झोन पासून १८ किमी दूर तर झोडाझरी अभयारण्या पासून १५.५ किमी दूर आहे.खान ही ५० वर्षासाठी दिल्या जाणार असून त्याचे क्षेत्र १४०,५९८ TPA इतके आहे.वन क्षेत्र कंपार्टमेंट हे ४३९ असून खान क्षेत्र हे ३५.७३ हेक्टर असेल. प्रोजेक्ट केटगरी ही बी – १ असेल तर येथे २० मिलियन ट्न्स लोह उपलब्ध राहणार आहे.
लोहार डोंगरी चे महत्त्व:
ह्या गावातील खान जमीन ही एक डेकडी बनली असून हा खडक २०० कोटी वर्षाच्या बेडेड हेमाटाईट पासून बनले असून त्यात २० टक्के लोह आढळते. येथील लोहखनिज जास्त प्रमानात ४४ मीटर खोलवर आहे.ब्रहपुरी जवळील लोहार डोंगरी ह्या जंगलातील गावाजवळ ०.५ ते ०.६ घनतेचे जंगल असून येथे अनेक वाघ, बिबट,अस्वल, कुत्रे ,कोल्हा,लांडगा, हाईना ,चितळ, पोरकपाईंन आणि इतर अनेक स्तनधारी १७ प्रजाती आढळतात. सोबत पक्षांच्या, सरपटणाऱ्या प्राण्याच्या, कीटकांच्या अनेक प्रजाजी आढळत असून येथील जंगल हे निसर्ग, पर्यावरण, हवामान,वने आणि वन्यजीवासाठी अतिशय महत्वाचे आहे. TCP, WII आणि NTCA नुसार प्रस्तावित खान क्षेत्र हे वाघांचे भ्रमणमार्ग आहेत आणि यासाठी खाणीना केंद्राची परवानगी लागते.
वन विभागातर्फे खानिसाठी चुकीचा रिपोर्ट:
२०२१ मध्ये वन विभागाने खानी साठी अभ्यास केला होता तसेच ११/४/२०२३ मध्ये D.C.F ह्यांनी खास खानि साठी जंगलाचा थोडा चुकीचा रिपोर्ट (site inspection report) सादर केला होता हे विशेष. नेट प्रेसेंट व्हॅलू किंमत १२२८५९० पर हेक्टर मागितला असून वन विभागाला ह्यामुळे ४,४१,५५५२५ रुपये मिळेल.हे जंगल रिझर्व फॉरेस्ट ,इको क्लास व्हॅलू E – असून घनता ०.५ इतकी आहे. परंतु शेड्युल एक प्रजाती नसल्याचे तसेच राष्ट्रीय अभयारण्य, वन्यजीव अभयारण्य नसल्याचे सांगितले आहे.
त्यांचे मते येणारी खान संरक्षित जंगलात नाही,ही खान वन्यजीव अभयारण्याचे बाहेर आहे,हा भाग वाघ भ्रमंती क्षेत्र असले तरी ते वन्यजीव भ्रमंती क्षेत्र नाही.वन विभागाचे मते पर्यावरण आणि वन्यजीव परवानगीची गरज नाही.
येथे वृक्षांच्या ४३ प्रजाती असून १८०२४ इतके वृक्ष आहेत. ३० गर्थ ची लहान झाडे ३१९८ ,४५ गर्थची ५६३४,६० गर्थची ३०३२ ,७५ गर्थची २२५९ ,९० गर्थची १३२० आणि मोठी झाडे २८३० आहेत असे म्हटले आहे.
चुकीने यवतमाळ जिल्ह्यात वृक्ष लागवडीची तयारी:
खरं तर खान स्थळी तोडलेले जंगल त्याच परिसरात, जिल्ह्यात भ्रमणमार्गातील शेती विकत घेऊन लावणे योग्य असते परंतु वनविभागाने ३६.४९ हेक्टर जागेवर यवतमाळ जिल्ह्यातील उमरी, इजारा येथे वृक्ष लागवड (CA) करण्याचे ठरविले आहे.
खाणी साठी मिळालेल्या आणि मिळणाऱ्या परवानग्या:
१) १३/९/२०१९ ला महाराष्ट्र शासनाने लेटर ऑफ इंटेंट दिले.
२) महाराष्ट्र शासनाने २०२०/२१ आणि ११/११/२०२५ ला मान्यता पत्र दिले.
३) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २३/६/२०२२ ला लोहार डोंगरी ह्या गावात,जनसुनावणी घेतली होती.कुणीही खाणीला फारसा विरोध केला नाही.
*खाणीत किती लोहार डोंगरी येथील लोकांना नौकरी मिळेल ? खाण संस्थेकडून दिलेल्या माहितीनुसार एकूण १४८ लोकांना फायदा मिळेल असे म्हटले असले तरी केवळ ३६ लोकांनाच नौकरी मिळतील.त्यात अती शिक्षित असे २० लोक असतील तर १० लोकं मोठे शिक्षीत तर केवळ १० लोकं हे अडाणी असतील. ह्याचा अर्थ गावातील एकूण १५ लोकांना च नौकरी मिळण्याची शक्यता आहे.
खाणी साठी TOR ची मान्यता सुद्धा दिली गेली.
४) महाराष्ट्र वन्यजीव बोर्डाने जाणे २०२६ मध्ये खाणीला मान्यता दिली.
५)अजून MOEFCC फॉरेस्ट क्लिअरन्स मिळाले नाही,
६) अजून NBWL/NTCA तर्फे परवानगी दिली नाही.
*वरील परवानग्या मीळाल्या तर खाणीला सुरू करता येऊ शकेल.
७) सध्या न्यायालयात जरी केस सुरू असली आणि निर्णयात खान बंदी झाली तर उत्तम तरी आपण केंद्र शासनाकडून सुद्धा खाणीला मान्यता मिळू नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे.
खाणीमुळे निसर्गाचे होणारे नुकसान:
* येथील जंगल तोडीमुळे स्थानिक हवामानाचे नुकसान होईल.
* भूशास्त्रीय, जल, वायू पर्यावरनाचे नुकसान , प्रदूषण होईल.
* वाघ आणि वन्यजीवांचे फार नुकसान होणार
* ग्रामीण लोकांचे वनोपज, औषधी चे नुकसान होणार
जंगलातील खाणी मुळे आधीच गडचिरोली चे प्रचंड नुकसान होत आहे,चंद्रपूर चे त्याही पेक्षा मोठे नुकसान झाले आहे.लोहारा जवळील अदानी कोळसा खाणीचा प्रस्ताव आधीच १५ वर्षापूर्वी आम्ही आधीच रद्द केला होता,तसेच त्यावेळी बफर झोन मध्ये १० उद्योग प्रस्तावित होते.आता एकही खान जिल्ह्यात येऊ नये असा प्रयत्न शासनाने,मंत्री,नेते ह्यांनी केली पाहिजे.जनतेने जीवन जगण्यासाठी आतातरी पुन्हा उद्योग येऊ नये असा प्रयत्न केला पाहिजे , संस्थानी आंदोलने,उपोषणे केली पाहिजे असे आवाहन खालील आणि इतर पर्यावरण आणि वन्यजीव संस्था आणि अभ्यासकाने दिली आहे.
प्रा.सुरेश चोपणे
*अध्यक्ष – ग्रीन प्लॅनेट सोसायटी
* माजी सदस्य – REC,MOEFCC दिल्ली
खाणीला विरोध करणाऱ्या संस्था आणि अभ्यासक:
१) प्रा.सुरेश चोपणे अध्यक्ष – ग्रीन प्लॅनेट सोसायटी , चंद्रपूर
२) नागपूर मध्ये वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर अनेक संस्था…..















