
स्थानिक यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूर येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद सांबारे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेश घोगरे, प्रमुख अतिथी डॉ. ललिता पुनया या होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि यशोदाबाई खापर्डे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयातील महिला प्राध्यापक झरीना सलीम, रश्मी नारनवरे, पूर्णिमा ठेकेदार, छाया गजघाटे, शुभांगी भोयर, अनुराधा नवघरे, प्रीती खोब्रागडे, शलाका पातूरकर, वरिष्ठ लिपिक लीना किटके, कनिष्ठ लिपिक अर्चना बागडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद सांबारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला सक्षमीकरणांवर भर देऊन महिलांनी कुटुंब समाज आणि देश यांचे नेतृत्व करावे असे आवाहन केले. प्रा. राजेश घोगरे यांनी महिला दिनाचा ऐतिहासिक आढावा देऊन आजच्या काळात महिला राज गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी डॉ. ललिता पुनय्या यांनी महिलांनी अधिकाराबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संगीता घोगरे, संचालन डॉ. सूर्यकांत कापशीकर आणि आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र कटरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.














