
नागपूर – अयोध्येत रामजन्मभूमीवर श्रीराम मंदिराची निर्मिती आणि त्यात श्रीराम विधिवत विराजमान होण्याचे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले. देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आज याचि देही, याचि डोळा अवघ्या देशानेच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्याला असलेल्या हिंदु समाजाने अनुभवला. अभूतपूर्ण अशा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ यांच्या हजारो साधुसंध आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. साऱ्या देशाने हा क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.
विशेषतः १९९० आणि १९९२ च्या कारसेवेत सहभागी झालेल्या कारसेवकांसाठी हा क्षण अत्यंत भावूक असा होता. भारत देश राममय झालेला आहे. सुवर्ण अक्षरात आजचा दिवस लिहिला जाईल. इतिहासात कधीही न झालेला दीपोत्सव आज देशभरात पाहायला मिळेल. याच सोबतच नागपुरात सुद्धा हे राममय वातावरण पाहायला मिळाले,
नागपुरातील सुरक्षा नगर दत्तवाडीत महिलांचा उत्साह पाहायला मिळाला. रस्त्यावर अंगणात आणि दारोदारी सजावट पाहायला मिळाली, आकर्षण म्हजे रांगोळी भव्य दिव्य अशी ठरली, त्यात बेबीताई डबाले, रजनी मुळे, मंगला पाल ,सुनंदा निंबाळकर ,दिपाली लांजेवार ,वर्षा गौतम, तेजस ढबाले, सानिया पाल ,वैष्णवी पाल, वैष्णवी निंबाळकर, बेबी मुळे, धनश्री मुळे, पद्मावती बंड, समृद्धी पाटील, श्वेता मसराम, सर्व माता भगिनी लहानाचा सहभाग पाहायला मिळाला .