कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी कामाला लागावे

0

विजयाचा निर्धार व लोकहितैषी योजना तळागाळात पोहचवून कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी कामाला लागावे- हंसराज अहीर (Hansraj Ahir)

चंद्रपूर (Chandrapur) :- अविश्रांत परिश्रम, समर्पण व त्यागी वृत्तीच्या कार्यकर्त्यांमुळे भाजपाने राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळविले. या कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाला यशाचे लक्ष्य गाठणे शक्य असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवत त्यांच्या भावनांचा आदर राखण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारून योग्य सुचना व मार्गदर्शन करीत कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेच्या कार्यात अधिकाधीक सकीय करण्याची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घ्यावी तसेच विजयाचा निर्धार व लोकहितैषी योजना तळागाळात पोहचवून कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजपा महाअधिवेशनाला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

स्थानिक शकुंतला लॉन सभागृहात दि. 04 ऑगस्ट रोजी भाजपा महाअधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमास मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. भाजपा कार्यकर्ते हेच पक्षाचा मुळ कणा आहेत. त्यांच्या अविश्रांत मेहणतीमुळे जिल्ह्यात पक्षाने कधीच मागे वळून बघीतले नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विजयाचे लक्ष्य ठेवून सर्वच विधानसभा काबीज करून विरोधकांना त्यांची खरी जागा दाखवून देण्याकरीता सर्वांनी पक्षसंघटनेच्या कामाला लागावे राज्य व केंद्र सरकारच्या लोकहितैषी योजनांची माहिती शहरांपासून गांव खेड्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारत राष्ट्र व लोकाभिमुख व विकासाला वाहुन घेणाऱ्या सरकारचे कार्य घराघरात पोहचवित विरोधकांचा सरकारविरोधी कट हाणून पाडावा असे आवाहन अहीर यांनी केले.

आपल्या मार्गदर्शनात प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या कार्यकाळातील ओबीसी, शेतकरी, महिला व युवकांच्या उत्थानासाठी राबविलेल्या अनेक महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करीत हंसराज अहीर यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अंमलात आणलेल्या अग्निवीर या योजनेचा समर्पक दृष्टीकोण विषद केला. कोरोना काळातील मोदी सरकारचे प्रभावी कार्य, व्हॅक्सीनचे उत्पादन हे जागतीक स्तरावर गौरविल्या गेले. शेतकरी सन्माननिधी, पिकविमा, शेतपिकांना पुरेसा एमएसपी, कृषीपंपाना वीज माफी, युरीया स्थीर किंमती, आयुष्यमान, आवास, संविधानदिन, नक्षलवाद, आतंकवाद, काश्मिरातील 370/35ए, सीमासुरक्षा, चीन, पाकिस्तान व बांग्ला देशाविषयीचे कणखर धोरण या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

राज्य व केंद्र सरकारवर टीका करण्यापलिकडे विरोधकांकडे विषय नाही त्यांचे खोटे नॅरेटीव्ह त्यांचेवर उलटविण्याकरीता भाजपा कार्यकर्त्यांकडे अनेक प्रभावी मुद्दे, विषय व शेकडो योजनांचे बळ असल्याने या सर्व उपलब्ध्या सर्व घटकांकडे पोहचविण्याचे कार्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्षमपणे करावे असेही अहीर यांनी भाषणातून सांगीतले. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर, जि.प. माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजपा नेते विजय राऊत, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, ब्रिजभुषण पाझारे, महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष सविता कांबळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश आगलावे, म.प्र. सदस्य विनोद शेरकी व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभा सदस्य संख्या
महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या
विधानसभा रचना
विधानसभा महाराष्ट्र
विधानसभा कलम
विधानसभा सदस्य पात्रता
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष
भारतात किती विधानसभा आहेत

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा