
नागपूर NAGPUR – कुणबी सेवा संघाच्या वतीने कुणबी समाज सभागृहाची मागणी अखेर पूर्ण होत आहे. डोंगरगावं येथे या सांस्कृतीक भवनाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाले. 10 कोटी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. . अध्यक्षस्थानी कृषि बाजार समितीचे माजी सभापती केशवराव डेहनकर,सत्कारमूर्ती डॉ परिणय फुके,आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल देशमुख,माजी मंत्री सुनील केदार,माजी आमदार डॉ आशिष देशमुख,खासदार कृपाल तुमाने, डॉ बबनराव तायवाडे, डोंगरगाव सरपंच हिमांशू बाविस्कर,ग्रामसेवक भैस्वार कुणबी समाज अध्यक्ष रमेश फिस्के आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या स्वप्नपूर्तीसाठी माजी आमदार डॉ परिणय फुके यांचा कुणबी सेवा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कौशल्य विकास केंद्राअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या जगतगुरू सांस्कृतिक भवनाच्या उदघाटनाला पुन्हा मी येणार असल्याचे फडणवीस यांनी आत्मविश्वासाने सांगितले.प्रास्ताविक कुणबी सेवा संस्थेचे अध्यक्ष रमेश फिस्के यांनी केले. संचलन क्षिप्रा मानकर तर आभार प्रशांत अर्डक यांनी मानले.