दंतेवाडा: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात आले.