अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा १४५ वा पुण्यतिथी सोहळा

0

सोलापूर : भक्तांच्या पाठिशी कायम राहणाऱ्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा आज १४५ वा पुण्यतिथी सोहळा पार पडला. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्यभरातील हजारो भक्तगण अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते. पहाटे चार वाजल्यापासून वटवृक्ष देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर अक्कलकोट संस्थानच्या राजघराण्यातील मालोजीराजे तिसरे यांच्या हस्ते महानैवेद्य दाखवत आरती संपन्न झाली. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सपत्नीक पूजा केली.आज दिवसभर रात्रीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रीघ यानिमित्ताने पहायला मिळाली.