मेणबत्ती कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू

0

 

धुळे – धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीररित्या भाजल्याने जखमी आहेत. वाढदिवसानिमित्त वापरली जाणारी आकर्षक मेणबत्ती या कारखान्यामध्ये बनवली जात होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आज भयानक आग लागली आणि महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतक मजूर हे जैताने येथील राहणारे असल्याचे समजते. आशाबाई भैया भागवत (वय ३५) आणि राजश्री भैया भागवत (वय १५), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चोघांचा यात समावेश असल्याचे बोलले जात आहे. चौकशीत आगीचे नेमके कारण समोर येणार असल्याच पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले असून जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतकात एक अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास आता पोलिस करीत आहेत.