११ सिंचन प्रकल्पांत २८ टक्केच पाणीसाठा
चंद्रपूर. वातावरणात झपाट्याने फेरबदल दिसून येत आहे. कधी उन्हाच्या तीव्र झळा, तर मधूनच अवकाळी असा क्रम सुरू आहे. यंदा अनेक भागात अनेकदा अतिवृष्टी झाली. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा जवळपास सर्वांचाच समज होता. मात्र, निसर्गाने हा समज खोटा ठरविला आहे. एप्रिलच्या मध्यातच चंद्रपुरातील (Chandrapur ) 11 सिंचन प्रकल्पांत 28 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळ सोसाव्या लागण्याची शक्यता (possibility of water scarcity ) आहे. त्यातच यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचे संकेत मिळत आहे. तेवढेच कामीकी काय म्हणून अलनिनोच्या प्रभावाने यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा इशाराही दिला गेला आहे. अशात चंद्रपूरकरांसाठी आगामी काळ अडचणीचा ठरणार ऐवढे मात्र नक्की. यामुळे आत्तापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक ठरले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक नोंदविले जात आहे. पारा ४३ अंशांच्याही वर गेला आहे. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण होताहेत. त्यातच यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. जिल्ह्यातील एक जलाशय आत्तापासूनच रिकामा झाला आहे. तर दुसऱ्याची अवस्था बिकट आहे. यावर्षी एक ना अनेकदा अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. पावसाळ्यात जिल्ह्यातील नद्या, नाले, जलाशय दुथडी भरून वाहत होते. मात्र उन्हाळा सुरू होताच जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला. जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती पाहता भविष्यात गंभीर जलसंकटातून जाण्याची शक्यता आहे.
अशी आहे स्थिती
जिल्ह्यातील ११ जलाशयांपैकी चंदई प्रकल्प कोरडा झाला आहेत. लभनसराड जलाशयात केवळ २४ टक्के पाणीसाठा आहे. नालेश्व्र ३७ टक्के, चारगाव ३३ टक्के, असोलामेंढा ८१.३७, घोराझरी १९, अमलनाला ३०, पकडीगुड्डम ३१, डोंगरगाव ६५, इराई ५३.१७ टक्के पाणी शिल्लक आहे. एप्रिल महिन्यात या धरणांची हीच अवस्था अशीच राहिल्यास येत्या काळात नागरिकांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते.