सराफा व्यावसायिक तिहेरी हत्याकांड, सात जणांना जन्मठेप

0

भंडारा : तुमसर येथे नऊ वर्षांपूर्वी सराफा व्यावसायिक त्यांची पत्नी व मुलगा यांच्या हत्येप्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी हा निर्णय दिला. यातील सहा आरोपी नागपुरातील असून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांमध्ये शहानवाज उर्फ बाबू सत्तार शेख (३२), महेश सुभाष आगासे (३५), सलीम नजीम खा पठाण (३४), राहुल गोपीचंद पडोळे (३२), मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल युसुफ शेख (३४), शेख रफिक शेख रहमान (४५) व केसरी मनोहर ढोले (३४) अशी आरोपींची नावे आहेत.
२५ फेब्रुवारी २०१४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तुमसर येथील प्रतिष्ठित सराफा व्यवसायिक संजय चिमणलाल रानपुरा (सोनी)(४७) त्यांची पत्नी पूनम संजय रानपुरा (४३) व त्यांचा मुलगा दुर्मिळ संजय रानपुरा (१२) यांची हत्या करण्यात आली. आरोपीनी ८.३ किलो सोने चांदीचे दागिने व ३९ लक्ष रुपयांची रोकडही चोरून नेली होती. हत्येनंतर अवघ्या २४ तासात तुमसर पोलिसांनी आरोपींना अटक केली. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली