मुंबई MUMBAI : मध्य रेल्वेच्या निफाड रेल्वे स्थानकात मुंबई कडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे लाईन शेजारील साईड ट्रॅकवर पार्सल मालगाडीचा शेवटचा डब्बा रुळावरून उतरल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ही माहिती रेल्वेच्या संबंधित विभागाला मिळताच पंधरा ते वीस मिनिटांमध्ये यंत्रसामग्रीचा वापर करत पार्सल मालगाडीचा डब्बा हा रुळावर पूर्ववत करण्यात यश आले. साईड ट्रॅकवर ही घटना घडल्याने मेन लाईनवरील मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू चालू आहे.