अमरावती AMRAWATI – अमृत योजनेअंतर्गत AMRUT YOJNA अमरावती शहरातील वडाळी WADALI तलावाचे सुशोभीकरण व गाळ काढण्यासाठी 22 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या तलावातील गाळ काढण्यासाठी अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणाNavneet Kaur आज सकाळी वडाळी तलावावर हजर झाल्या. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी स्वतः श्रमदान करत या कामाला हातभार लावला. वडाळी तलाव हा ब्रिटिश कालीन तलाव असून याच तलावातून पूर्वी अमरावतीला पाणीपुरवठा व्हायचा. मात्र , या तलावातील गाळ काढला तर याचा जलसाठा वाढेल व त्याचा अमरावती करांना फायदा होईल. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी रवी राणा , नवनीत राणा यांच्या प्रयत्नाने बावीस कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. आज सकाळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपवन संरक्षक चंद्रशेखर बाला , खासदार नवनीत राणा यांच्या सह कार्यकर्त्यांनी व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा श्रमदान केले.