दुस-या चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात

0

दुस-या चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार , दिग्दर्शक जब्बार पटेल यांची उपस्थिती, 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवात 17 चित्रपट होणार प्रदर्शित, उद्घाटन सोहळ्यानंतर मनोज शिंदे दिग्दर्शित वल्ली नामक चित्रपट ओपनिंग फिल्म रुपात झाला प्रदर्शित, मुंबई चित्र नगरीबाहेर चित्रपट चित्रीकरण केल्यास निःशुल्क असेल, यासाठी एक खिडकी योजना सुरू करणार, एनडी स्टुडिओ महाराष्ट्र सरकार घेणार, 3 महिन्यात चित्रपटाच्या अनुदानाबाबतचा निर्णय घेतला जाणार, अशा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणा

 

अँकर:–दुस-या चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शहरात शानदार सुरुवात झाली.राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार , पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख , दिग्दर्शक जब्बार पटेल यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवात 17 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर मनोज शिंदे दिग्दर्शित वल्ली नामक चित्रपट ओपनिंग फिल्म रुपात प्रदर्शित झाला. या फिल्म फेस्टिव्हलपासून युवावर्गाने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे मत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले. आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करत चित्रपटनिर्मिती विषयक वातावरण निर्माण करावे लागेल असे सांगताना 20 फेब्रुवारीला डोम थिएटरमध्ये मराठी फिल्म फेस्टिव्हल होणार असल्याचे ते म्हणाले. मुंबई चित्रनगरीबाहेर फिल्म शूटिंग केल्यास तो निःशुल्क करावा याबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निर्मिती परवानग्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. कलादिग्दर्शक स्व. नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ महाराष्ट्र सरकार चालविणार असून उत्तम व्यवस्थापन करण्याचा निश्चय त्यानी बोलून दाखवला. केवळ 3 महिन्यात चित्रपटाच्या अनुदानाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.