आशा, अंगणवाडीसेविका, मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा

0

आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये सरळ संबंध असतो त्यामूळे आशा सेविका अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक मदतनीस अंगणवाडी सेविका यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

शासनाने त्यांच्या मगण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही
कोरोना काळात आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांनी स्वतःचा जिव धोक्यात घालून फ्रंट वरती कोरोना योद्धा म्हणून कार्य केले परंतु महिला विरोधी असलेले सरकार आशा सेविका, व अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडविण्याच्या मानसिकतेत नाही. संप काळातील या भगिनींच्या मानधनात कपात करण्यात आला आहे

शासनाकडे आपल्या कामाचा योग्य मोबदला मागण्यासाठी केलेल्या आंदोलन काळातील मानधनात कपात करणे म्हणजे महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर कार्य करणाऱ्या या भागिनींवर अन्यायच आहे. आशा सेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या पाठीशी राष्ट्रवादी महिला काँग्रेस खंबीरपणे उभे आहे. अन्याय करणाऱ्या सरकारचा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदन देतांना उपस्थित जिल्हा महासचिव सरस्वती गावंडे, जिल्हा सचिव शोभा घरडे, जिल्हा संघटक सचिव लता जांभूळकर, माधुरी पांडे रेशमा मेश्राम सुशीला सुशीला नैताम, हंसा मोहुरले अन्य महीला उपस्थित होत्या