शर्मिष्ठा मुखर्जींने केले कार्यकर्त्यांना आवरण्याचे आवाहन

0

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी  काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सातत्याने होणारी विखारी टीका आणि ट्रोलिंग याला कंटाळलेल्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी अखेर राहुल गांधींना पत्र पाठवून न्याय मागितला आहे.

राहुल गांधींना पाठवलेल्या पत्रात शर्मिष्ठा म्हणाल्या की, तुमच्यावर आणि काँग्रेसवर टीका केल्यामुळे काँग्रेस समर्थक मला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. शर्मिष्ठा यांनी पत्रात राहुल गांधींच्या “द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान” या घोषणेचा उल्लेख केला आहे. तुमची आवडती घोषणा तुमच्या समर्थकांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. कारण ते तुमचा सर्व द्वेष तुमच्यावर टीका करणाऱ्यांवर पसरवतात. जर तुम्ही न्यायासाठी गंभीर असाल तर अशा लोकांवर कारवाई करा असे शर्मिष्ठा यांनी म्हंटले आहे. शर्मिष्ठा यांनी 5 फेब्रुवारी रोजी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये म्हटले होते की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे.

पक्षाने आपल्या चेहऱ्याचा विचार करायला हवा. याशिवाय त्यांनी त्यांच्या ‘प्रणव माय फादर’ या पुस्तकात राहुल गांधींच्या राजकीय अपरिपक्वतेबाबत अनेक दावे केले होते.त्यांनी पुस्तकात लिहिले होते की, काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता राहुलमध्ये नाही, असा प्रणवांचा विश्वास होता. शर्मिष्ठा यांच्या या बोलण्याने संतापलेल्या काँग्रेस समर्थकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले. यासंदर्भात त्यांनी राहुल गांधींना पत्र लिहिले आहे. र्मिष्ठा यांनी लिहिले- माझे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर माझ्या वडिलांवर आणि माझ्या विरोधात ट्रोलिंग होत आहे. तुम्हाला माहित आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये केवळ एखाद्याची प्रशंसा करणे समाविष्ट नाही, तर टीका कृपापूर्वक सहन करण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. मात्र, तुम्ही तुमच्या समर्थकांना हे समजावून सांगण्यात अपयशी ठरला आहात अशा कानपिचक्या शर्मिष्ठा यांनी दिल्या आहेत.

अलीकडेच जयपूर लिट फेस्टमध्ये मी म्हणाले की, तुम्ही हा पक्ष चालवण्यात अपयशी ठरला आहात. तुमच्या नेतृत्वाखाली दोन लोकसभा निवडणुका पक्षाचा पराभव झाला आहे. तरीही पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. पक्षाने गांधी-नेहरू चेहऱ्याशिवाय दुसरा चेहरा समोर ठेवायला हवा. पक्षाबद्दल माझे मत सर्वांसमोर मांडणे हा माझा लोकशाही अधिकार आहे. तुम्ही न्यायासाठी गंभीर असाल तर अशा लोकांवर कारवाई करा. नवीन शाही यांच्या ट्विटला सहमती दर्शवणाऱ्या लोकांवरही कारवाई करा. तुमच्या सोशल मीडिया प्रमुखावर कारवाई करा, कारण त्यांच्या मर्जीनुसार अशी भाषा लिहिली जात आहे असे शर्मिष्ठा यांनी आपल्या पत्रात नमूद केलेय.

भगर पिठाचे शीर लाडू | Shankhnaad News #shankhnaadnews #live