चंद्रपूर जिल्ह्य़ातील अभ्यासू तरुण ॲड. दीपक चटप यांचे फोटो उपराष्ट्रपतींच्या अधिकृत फेसबुक, इंस्टाग्रामवर …..

0

भारताचे उच्चायुक्तांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती .

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे नुकतेच लंडन दौऱ्यावर होते. या दौऱ्यात भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला होता . या कार्यक्रमात (Chandrapur ) चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर (Gadchandur )येथील रहिवासी व सध्या स्कॉलरशीप घेऊन (Landon)लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत असलेले (Adv.Deepak Yadavrao Chatap)ॲड.दीपक यादवराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान उपराष्ट्रपती धनगड व ॲड. दीपक चटप यांच्यात थेट संवाद झाला. या संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधले. चंद्रपूरकरांच्या दृष्टिकोनातून आनंदाची बाब म्हणजे या संवादात्मक भेटीचे फोटो उपराष्ट्रपतींच्या अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, “जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात युवकांची संख्या विपूल आहे. युवाशक्ती ही खरी राष्ट्रशक्ती असते. विदेशातील भारतीय हे इथले भारताचे अम्बेसिडर आहेत. तुमच्या शिक्षणाचा उपयोग देशकल्याणासाठी करावा. जात, धर्म, पक्ष आदी भेदाभेद बाजूला सारुन आपण भारतीय आहोत ही ओळख स्मरणात असू द्या.” दरम्यान भाषणानंतर उपस्थितांशी थेट संवाद साधताना ॲड.दीपक चटप यांचीही उपराष्ट्रपतींनी विचारपूस केली.

मी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चेवेनिंग स्कॉलर तरुण वकील आहे. शेतकरी, आदिवासी, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत रचनात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो. वकीली व संसदीय धोरणनिर्मिती हे माझे मुख्य आवडीचे विषय आहेत. या दोन्ही स्तरावर तुम्ही केलेले काम आमच्यासाठी दिशादर्शक वाटते’ असे हितगुज दीपक चटप यांनी केले. यावर स्मितहास्य करत उपराष्ट्रपती म्हणाले, ‘आपण करत असलेले काम कौतुकास्पद आहे. धोरणनिर्मिती आणि विधीक्षेत्र यांच्यात अनेक समान दुवे आहेत. त्यामुळे या दोन्ही स्तरावर तुम्हाला योगदान देता येत आहे. तुमच्या सारख्या युवकांकडून भारताला खूप आशा आहेत. उत्तमोत्तम काम करत राहा’ अशा सदिच्छा उपराष्ट्रपती जगदीप धनगड (Vice President Jagdeep Dhangad)यांनी व्यक्त केल्या.
यावेळी भारताचे उच्चायुक्तांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

भारताच्या उपराष्ट्रपतींशी लंडनला संवाद साधण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून देशाच्या धोरणनिर्मितीतील प्रमुखांपैकी एक व्यक्ती, राज्यसभेचे सभापती आणि ज्येष्ठ वकील असलेल्या उपराष्ट्रपतींना जवळून अनुभवता येणे अतीशय प्रेरणादायी असल्याचे मत ॲड.दीपक चटप यांनी यावेळी व्यक्त केले.