नागपूर (Nagpur ): नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) आज कतार एअरवेजच्या विमानाने नागपुरात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय तस्कराकडून 3.36 किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत 1.80 कोटी रुपये असल्याचे कळते.
(Team of Mumbai NCB)मुंबई एनसीबीच्या पथकाला याविषयीची कुणकुण लागली होती यावरून त्यांनी मंगळवारी रात्रीपासून विमानतळावर निगराणी ठेवली. हा प्रवासी विमानातून उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या जीन्स पॅन्टच्या आत सात खिसे आढळून आले यात पेस्टच्या स्वरूपात पाकिटामधून सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला. एनसीबीच्या पथकाने त्याला पुढील कारवाईसाठी कस्टमच्या ताब्यात दिले.