अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

0

मुंबई-ज्येष्ठ अभिनेते आणि सिने-निर्माते जयंत उर्फ अण्णा सावरकर (Jayant Sawarkar) यांचे आज निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाण्यातील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सावरकर यांनी गेली चार दशके मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केलं व अभिनयानं मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती. सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. ३० हून अधिक अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते.
लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील अशी विविध पात्र त्यांनी साकारली.काही महिन्यांपूर्वीच ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. शिवाय ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विषेश गाजली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.