ॲड.नंदा पराते यांची नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

0

नागपूर(Nagpur) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खारगे,माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी, राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्ष अल्का लांबा व महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी काँग्रेसचे दृष्टीकोन व उद्दिष्ट पार पाडण्याची जबाबदारीसह नागपूरात महिलांचे संघटन विकसीत करून काँग्रेसला जास्तीत जास्त जनाधार प्राप्त होण्यासाठी कार्य करीत असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांची नियुक्ती केली आहे. याबद्दल आभार जाहीर केले.

अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक,महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनिथाला,महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले,शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे,माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार,माजी मंत्री व आमदार नितीन राऊत,माजी मंत्री सतिश चतुर्वेदी,अनिस अहमद यांनी नागपूर शहरात महिला संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या ॲड. नंदा पराते यांची नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्तीसी प्रयत्न केल्याबद्दल आभारी आहे.
आदिम नेत्या ॲड. नंदा पराते ह्या सन २००३ पासून आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. महाराष्ट्रातील ३३ आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आदिमने लढा उभारला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या २००७ च्या निवडणूकीत ९ नगरसेवक निवडून आले, त्यात आदिमची महत्वाची भुमिका होती. भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहूल गांधी यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथे कॅाग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये महाराष्ट्र प्रदेश कॅाग्रेसचे सरचिटणीस म्हणून ॲड. नंदा पराते यांची नियुक्ती करून जबाबदारी सोपविण्यात आली आणि २०२२ मध्ये भंडारा जिल्हा कॅाग्रेसच्या प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक चळवळीत सक्रीय असून अनेक आंदोलन केले. आदिम नेत्या असलेल्या ॲड. नंदा पराते यांना संघटनात्मक कार्याचा दांडगा अनुभव आहे. हलबा समाजाच्या विविध प्रश्नावर त्यांच्याकडून सतत आंदोलन करण्यात येत असतात. येत्या विधानसभा निवडणूक व महानगरपालिका निवडणूकीत महिलांना काँग्रेसमध्ये जोडण्यासाठी व महिलांमध्ये कॅाग्रेसचे उद्देश पोहोचवून महिलांची संघटना विकसीत करून जनाधार वाढविण्यासाठी नागपूर शहर जिल्हा कॅाग्रेस समितीच्या अध्यक्ष पदी ॲड. नंदा पराते यांच्या नियुक्तीसाठी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, दिपक काटोले, आमदार अभिजित वंजारी, सरचिटणीस गिरीश पांडव,अतुल कोटेचा, उमेश डांगे, उमाकांत अग्नीहोत्री यांनी विश्वास टाकल्या बद्दल सर्वांचे आभार मानले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांची नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या पदावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल माजी उपमहापौर अण्णा राऊत,अनिल आदमने, रजत देशमुख,.गजानन धांडे , प्रकाश बांते, सुकेश निमजे,संजना देशमुख, रचना डांगे, शकुंतला वठ्ठीघरे, मंदा शेंडे,माया धार्मिक , अनिता हेडाऊ, मंजू पराते, पूजा देशमुख, संगिता उपरीकर, भानुमती नंदनवार, कुंदा निनावे* सह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी ॲड. नंदा पराते यांच्या नियुक्तीसंबंधी अभिनंदन केले असून या नियुक्तीबाबत सर्वांचे आभार मानले.