बीड- बीड जिल्ह्यात होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त भाजपा नेत्या पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहेत. काही दिवसच शिल्लक राहिल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. सध्या परळी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची सत्ता आहे. नेमकी हीच सत्ता राखण्याचं आव्हान धनंजय मुंडेंसमोर असणार आहे. परळीत बाजार समिती निवडणुकीच्या निमित्त पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीतून पंकजा मुंडे यांनी उमेदवारांसह सभासदांना मार्गदर्शन केले. ही निवडणूक तुम्ही नाही तर मी लढणार आहे. आपण आपली रोटी पुरणपोळी खाऊ पण आपले इमान गहाण ठेवायचं नाही. असं आवाहन पंकजा मुंडेंनी यावेळी केलं.