(Ahmadnagar)अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याचे नाव लवकरच (Ahilyanagar)अहिल्यानगर ()करण्यात होणार असल्याची घोषणा राज्याचे (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळे अहमदनगरचे लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार, राज्य सरकराने निर्णय घेतला आहे. नाव बदलण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचे भाग्य आहे, असे शिंदे म्हणाले.
अहिल्यादेवी यांचे कार्य हिमालयाएवढे मोठे आहे. त्यामुळे अहमदनगरचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, फडणवीस यांनीही अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहेत, असेही फडणवीस (Devendra Fadnvis) म्हणाले.