राहुल गांधीच्या भाषणात खालिस्तानवाद्यांच्या घोषणा

0

(San Francisco)सॅन फ्रान्सिस्को : (Congress leader Rahul Gandhi)काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात खलिस्तानी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करीत असताना तेथे खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली व खलिस्तानी झेंडे फडकावले. ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

या घटनेनंतर (Gurpatwant Singh Pannu, leader of the Khalistani movement)खालिस्तानी चळवळीचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने राहुल गांधी आणि (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. त्याने व्हिडिओ जारी केला आहे. राहुल गांधी अमेरिकेत जिथे जातील तिथे त्यांच्यासमोर खलिस्तानी उभे राहतील. 22 जूनला पुढचा नंबर मोदींचा आहे, असे त्याने म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी घोषणाबाजीवर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी हसले आणि म्हणाले, ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’ दरम्यान, खलिस्तान्यांच्या घोषणाबाजीनंतर तेथे उपस्थित भारतीय जनसमुदायाने प्रत्युत्तरात नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा दिल्या.