पुण्याच्या पोटनिवडणुकीवर बोलणाऱ्या वडेट्टीवारांना अजित पवारांनी झापले!

0

पुणेः भाजपा नेते व खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही जागा महाविकास आघाडी लढविणार असल्याचे सांगितले. आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोट निवडणूक लढवणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच भाजपाने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत. त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, ती महाविकास आघाडी लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वडेट्टीवारांना चांगलेच (Leader of Opposition Ajit Pawar) सुनावले आहे. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाली आहेत. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही, या शब्दात त्यांनी वडेट्टीवारांचा समाचार घेतला.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधाने केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असे लोक म्हणतील, असे पवार म्हणाले. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. खासदार बापट यांच्या निधनाला तीनच दिवस उलटून गेले असताना काँग्रेस निवडणुकीच्या मोडमध्ये आली आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा