अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे – चंद्रशेखर बावनकुळे

0

 

(Nagpur)नागपूर – (Sharad Pawar)शरद पवार सर्वांसाठी आदरणीय आहेत. मात्र, (Ajit Pawar)अजित पवारांनी शरद पवार यांच्या जीवनाचा जो आलेख मांडला त्यावरून असे वाटते की, वेळोवेळी शरद पवारांनी भूमिका बदलल्यामुळे पक्ष अडचणीत आला आणि त्यांची विश्वासार्हता देखील कमी झाली.अजित पवारांची भूमिका देशहिताची आहे. जनतेसमोर अजित पवारांनी सत्य परिस्थिती मांडली, त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे.महाराष्ट्राची जनता ही विश्वास ठेवेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
निवडणुकीला अजून वेळ आहे. जागावाटप समनव्यातुन होईल.जागे संदर्भात अधिकार माझ्याकडे नाहीत. (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपतींना भेटून विमानतळावर त्यांचं स्वागत करुन ते गेलेत. बाकी कार्यक्रमात  (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस होतेच, पक्षाची बैठक लागली असेल किंवा मुख्यमंत्री म्हणूण अनेक काम असतात म्हणून ते गेले असतील.शेवटी परिवारात तीन भाऊ असल्यावर एखाद्या विषयी कमी जास्त होऊ शकतो. मात्र, आमच्यात मनभेद नाहीत. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक बहुमत या सरकारला आहे. त्यामुळे हे सरकार सर्वाधिक पॉवरफुल आहे. समरजीत घाडगे यांच्या रक्तात भाजपा असणारा कार्यकर्ता आहे. असा निष्ठावंत कार्यकर्ता व नेता असल्यावर काहीही प्रसंग आला, तरीही ते कधीच पक्षापासून फारकत घेऊ शकत नाहीत. पक्षाची विचारधारा पाळणारा तो कार्यकर्ता असल्याने त्यांच्याबद्दल संभ्रम करु नये. जेव्हा परिवारात मतभेद होऊन तुमचा विश्वास संपतो. तेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांना सांभाळू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय व्यक्तीने परिवारात राजकारण आणू नये असं मला वाटतं. बच्चू कडू नाराज आहेत याविषयी विचारले असता बावनकुळे म्हणाले,ते अगोदर मंत्री होते, त्यामुळे माणूस असल्याने वाईट वाटते, त्यांना पक्षात सध्या चांगले स्थान आहे. आम्हालाही त्यांच्या पक्षाची सहानुभूती आहे. महायुतीमध्ये त्यांना चांगला दर्जा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक निर्णय पक्षात घेतले आहेत. त्यांच्यामुळेच दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय झाला. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, काहीतरी जबाबदारी देतीलच.

उध्दव ठाकरे यवतमाळ, वाशिम दौऱ्यांवर येत आहेत, केवळ हात वर करुन वज्रमुठ झाली, काही फरक पडला नाही, जेव्हां मुख्यमंत्री होते, तेंव्हा नागपुरात अधिवेशन घेतं नव्हते. विदर्भासोबत छळ केला, विदर्भ वैधानिक मंडळ बंद पाडलं. सत्तेत असताना जनतेचा विचार करतं नाही. त्यामुळे जनता सगळ लक्षात ठेऊन निवडणुकीत विकास करणाऱ्यांसोबत उभी राईल.