राज्य सरकारी बँक घोटाळा प्रकरणाचा पुन्हा तपास?

0

अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई -महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात नव्याने तपास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात शालिनीताई पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीने तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून (M.S. Co-Operative Bank Scam) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला सी समरी रिपोर्ट आधी रद्द करावा आणि मगच नव्याने तपास सुरू करावा, अशी मागणी प्रकरणातील तक्रारदार माणिकराव जाधव यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात विरोधीपक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Former DCM Ajit Pawar in trouble over bank scam enquiry demand) अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणात अजित पवार यांच्यासह एकूण ७५ जणांना आधीच क्लिनचीट देण्यात आली होती.

मात्र, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा काही वर्षापूर्वी गाजला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणी सी- समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यासह ७५ जणांना क्लिनचीट देण्यात आली होती. मात्र आता राज्यातील सरकार बदलले आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा या प्रकरणाचा पाठपुरावा सुरु केला असल्याचे मानले जात आहे. तक्रारदारांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाय अण्णा हजारे आणि शालीनीताई पाटील हे देखील यासंदर्भात फेरचौकशीची मागणी करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा अजित पवारांच्या अडचणी वाढतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता यावर न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा