गोंदिया- चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

0

हॉकफोर्सचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार झाल्याची घटना उघडकीस आली. ३0 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील सुपखार आणि मोतीनाला जंगलात ही चकमक घडली. घटनेत सुकमा जिल्ह्यातील भोरमदेव क्षेत्र कमेटीचा कमांडर राजेश ऊर्फ नंदा वंजाम (१९) रा. पालगुडेम ठाणा भेज्जी जि. सुकमा व नक्षल दलम टीम प्रभारी झोन समन्वयक गणेश (२७) रा. नरगुडा पो. कासनसूर जि. गडचिरोली अशी मृत नक्षल्यांची नावे आहेत.


घटनेच्या दिवशी बालाघाट जिल्ह्यातील गढी ठाण्यांतर्गत या दोन नक्षल्याचे मृतदेह सोबतच हॉकफोर्सच्या पथकांनी दोन एके ४७, एक रायफलसह इतर नक्सल साहित्य घटनास्थळावरून हस्तगत केले. मृत नक्सली बालाघाट जिल्ह्यातील जामसेरा वन चौकीजवळ खरेदीसाठी आले होते. ही माहिती कळताच त्यांच्या मागावर हाक फोर्सचे जवान पाठविण्यात आले. बालाघाट-मंडला रेंजचे आईजी संजय कुमार, बालाघाटचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ, नक्षल सेलचे आदित्य मिर्शा, विजय डावर आदी हॉकफोर्सच्या जवानांचा कौतुक करण्याकरिता घटनास्थळी पोहोचले.
नक्षलवादी राजेश नंदावर मध्यप्रदेश सरकारकडून ३ लाख, महाराष्ट्र सरकारने १२ लाख आणि छत्तीसगड सरकारने ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. गणेशवर मध्यप्रदेश सरकारचे ३ लाखाचे बक्षीस होते.

चित्ता कटरा पनीर भुर्जी आणि अमृतसरी पनीर पकोडा|Paneer Bhurji & Amritsari Paneer Pakora Recipe|Epi 46